बल्लारपूर शहरात बाल कामगार आढळला होटेल मालकावर गुन्हा दाखल

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील एका हॉटेल मध्ये बाल कामगार आढळल्याने हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आले.सचिन ज्ञानदेवराव अरबट दुकान निरीक्षक श्रेणी २, सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर हे २८ जानेवारी ला बाल कामगार धाड सत्र मोहीम राबवत असताना त्यांना रेल्वे चौक येथील एका हॉटेल मध्ये बाल कामगार आढळला.दुकान निरीक्षक सचिन अरबट यांनी त्या हॉटेल मालका विरुध्द बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली.बल्लारपूर पोलीसांनी हॉटेल मालकावर कलम ७९ बाल कामगार अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पॉलिश हवालदार दिवाकर गुरनुले करीत आहे.
Related News
पिंपळखुटा (लहान) शेतशिवारात वीज पडून 52 वर्षीय शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू
19-Jul-2025 | Sajid Pathan
कोल वॉश नंतरचा चांगला कोळसा रिजेक्ट म्हणून विकला जातोय आमदार किशोर जोरगेवारांचा विधानसभेत गंभीर आरोप
18-Jul-2025 | Sajid Pathan